Updated on: 2026-03-31 | Author: SSC Solutions Editorial Team

Marathi (Second Language) Chapter 11 Jngal Daayri Solutions

Q1. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७) आकलन कृती १. कृती पूर्ण करा. (०२) यापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी. १. ______ २. ______ ३. ______ ४. ______ साधारणत: कुत्रयापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽवऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता. २. आकलन चौकटी पूर्ण करा. (०२) वाघिणीच्या पिल्लांचे खेळ १ . ______ २.______ ३. स्वमत (०३) 'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.

१.

१. सांबर २. रानगवा

३. नीलगाय ४. रानडुक्कर

२. वाघिणीच्या पिल्लांचे खेळ

१. एकमेकांचा पाठलाग करणे

२. मारामारी करणे

३. लेखकाने उताऱ्यात वर्णन केल्याप्रमाणे वाघीण आपल्या लहानग्या पिल्लांची पावलोपावली काळजी घेताना दिसते. आपल्या मस्तीत रममाण मुलांना ती मध्येच थांबून मायेने चाटत होती.

जणू त्यांचा खेळ पाहून त्यांची निरागसता तिच्यातील आईपणाच्या भावनेला उधाण आणत होती. पिल्लांचं पोट भरावं म्हणून तिने मोठ्या कष्टाने शिकार केली होती आणि त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी ती त्यांना शिकारीकडे घेऊन गेली. जंगलात जाताना आपली सगळी पिल्लं आपल्या सोबत असावीत याचीही तिनं काळजी घेतली होती.

या सगळया घटनांवरून हे स्पष्ट होते, की वाघिणीला पिल्लांच्या सुरक्षेची खूप काळजी होती. ती कुठेही गेली तरी तिचं मन नेहमी पिल्लांकडे एकवटलेलं होतं, पिल्लांसाठी कितीही त्रास सोसण्याची तिची तयारी होती. पिल्लांना व्यवस्थित खाऊपिऊ घालण्याबाबत ती सावधान होती.

एखादी प्रेमळ, दक्ष, कर्तव्यतत्पर आई, आपल्या बाळाचं जसं संगोपन करते, तसंच ती आपल्या पिल्लांचं संगोपन करत होती. त्यामुळेच, लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली.

Q2. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७) आकलन कृती १. कृती पूर्ण करा. (०२) वाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू – १. ______ २. ______ ’ऑऽव्हऽऽ“ अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा रानकुत्री अशा पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. २. चौकटी पूर्ण करा. (०२) वाघिणीचा आवाज – ______ वाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली – ______ ३. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. (०३)

१.

१. नर वाघ

२. बिबळा

२.

ऑऽव्हऽऽ

नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात

३. मुलांपासून दूर गेलेली आई परत आल्यानंतर आई व मुले दोघांनाही खूप आनंद होतो. या पाठातील वाघीण आपल्या पिल्लांना सुरक्षित जागी सोडून रात्री शिकारीला गेलेली होती.

सकाळी पिल्लांजवळ परत येताच तिने त्यांना हाक मारली. आईची हाक कानावर पडल्यामुळे पिल्लांना खूप आनंद झाला. लपून बसलेली ती पिल्ले खेळकरपणे पटापट आईकडे झेपावली, तिच्या अंगावरही उड्या मारू लागली.

एक पिल्लू तिच्या पाठीवर उडी मारताना घसरून धपकन पाण्यात पडलं; पण आपण पडलोय याचंही त्याला भान नव्हतं. आपली आई खूप थकून आलीय आणि तिला विश्रांतीची गरज आहे याचंही त्यांना भान नव्हतं. थकल्या – भागलेल्या वाघिणीला खरंतर या गोंधळाचा त्रास होत होता; पण ती त्यांच्यावर फारशी रागावली नाही.

कदाचित तिलाही त्यांच्या आनंदामुळे जणू सुखच मिळत असावं. आई व मुलांच्या भेटीचा हा प्रसंग मनाला भिडणारा आहे.

Q3. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७) आकलन कृती १. लेखकाने बिबळयाची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा. १. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली २. ३. ४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता ५. ६. ७. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला ता.२७ मे १९९७, वेळ-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर. आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो. गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं; पण मला तरी काही दिसलं नाही. अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळयांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे त्यानं अद्याप आम्हांला पाहिलं नव्हतं, पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला.. तिखट कानांच्या बिबळयानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला. २. १. चौकट पूर्ण करा. (०१) प्रकल्पाचे नाव- ______ विश्रामगृहाचे नाव - ______ २. कारण द्या. (०१) चालताना वनमजूर अचानक थबकला; कारण ... 3. स्वमत (०३) भारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा.

1.

१. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली

२. लेखकाने सगळयांना हातानंच थांबायची खूण केली

३. लेखकाने दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली

४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता

५. त्याचा रंग आसपासच्या परिसराशी मिसळून गेला होता, शेपूट हलल्यामुळे तो लेखकांस दिसला

६. त्याची पाठ लेखक व साथीदारांकडे असल्यामुळे बिबळयाने त्यांना पाहिलं नव्हतं

७. वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला

2.

१.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर

कोळसावन

२. रस्त्यात एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं उमटली होती.

  1. भारतातील महाराष्ट्र राज्यामध्ये असलेले ताडोबा अभयारण्य माझ्या विशेष आवडीचे आहे. विविध प्रकारची वृक्षराजी कोरडे पानगळ वन, सपाट मैदानी भूप्रदेश, खोल दरी, तलाव आणि विविध प्रकारची प्राणिसंपदा अशी विविधता येथे आढळून येते. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा हे अभयारण्य पट्टेरी वाघांसाठी राखीव क्षेत्र आहे. हेच या अभयारण्याचे आकर्षण आहे. या वाघाबरोबरच बिबट्या, अस्वल, उदमांजर, रानमांजर, रानकुत्रे, वन्यबैल, गवा, ढोल, तरस, लाडंगा, कोल्हा, हरिण, सांबर, चितळ, भेकर, नीलगाय, अजगर, कोब्र, घोरपड अशा प्राणिसंपदेने हे अभयारण्य समृद्ध आहे. याशिवाय, येथे आढळणारे विविध जातीचे पक्षी व फुलपाखरे ही देखील प्रेक्षकांना येथे आकर्षित करतात. येथे प्रशिक्षित मार्गदर्शकासह जीपमधून केलेली जंगल सफारी म्हणजे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव होता. येथील निसर्गाची किमया पाहताना डोळयांचे पारणे फिटते.

Other Subjects