Updated on: 2026-03-31 | Author: SSC Solutions Editorial Team
१. कवी - नारायण सुर्वे
२. कवितेचा विषय - कष्टकर्याच्या जीवनाचे वास्तव व त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन रेखाटणे.
३. आभाळात शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे उमलले आणि सुखमयी, धुंदावणाऱ्या रात्री आल्या; पण रोजची भूक भागवण्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता, कराव्या लागणाऱ्या मेहनतीतच माझे सारे आयुष्य निघून गेले.
४. कवितेत आलेल्या शब्दांचे अर्थ लिहा. (०२)
१. रजनी, निशा
२. मदत
३. तापावे
४. शशी
५. 'दोन दिवस' या कवितेत कवी नारायण सुर्वे यांनी मांडलेले कामगारांचे भावविश्व जीवनाचा एक वेगळाच पैलू दाखवते. अडीअडचणींच्या काळातही जीवनाकडे पाहण्याचा आशादायी व सकारात्मक दृष्टिकोन देते.
कवीने साध्या-सोप्या भाषेत जगण्याचे तत्त्वज्ञान आपल्यासमोर मांडले आहे. ही गद्याशी नाते सांगणारी निवेदनात्मक लेखनशैली मला फार आवडली. भाकरीचा चंद्र, माना उंचावलेले किंवा कलम झालेले हात अशा सुंदर कल्पना मला फार आवडल्या.
जीवनाचे धगधगीत वास्तव रेखाटतानाही कामगाराचे जीवन जगण्यावरील प्रेम कायम आहे, ते प्रेम टिपणारी ही कविता मला फार आवडते.