Updated on: 2026-03-31 | Author: SSC Solutions Editorial Team
१.
१. थोरामोठ्यांकडे वार लावून देणे
२. वह्या पुस्तकांचा खर्च करणे
२.
तो ज्या मावशीकडे राहत होता तिची परिस्थिती यथातथा होती.
त्या दिवशी नागरिकशास्त्रासारखा निरंजनला अवघड वाटणारा पेपर होता.
३. परिस्थितीनुसार बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेतले तरच आपला टिकाव लागतो.
हे जीवनातील सत्य येथेही लागू पडते. ज्यांना हक्काचे घर नसते अशा मुलांना इतरत्र कोठेही आपला निवारा शोधावा लागतो. हा निवारा कधीपर्यंत सोबत असेल याची खात्री नसते.
त्यामुळे आहे ते टिकवून ठेवण्याकरता, परिस्थितीशी जुळवून घेत, प्रसंगी आपल्या आनंदाचा, इच्छा-आकांक्षांचा त्याग करून जीवन कंठावे लागते. हे जुळवून घेणे, शिकवावे लागत नाही, तर परिस्थितीनुसार ते आपसूकच घडून येते. त्यामुळे, हक्काचे घर नसलेली मुले इतरत्र राहताना परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिकतात.
१.
१. परीक्षा बुडून तो नापास होणार.
२. भडसावळे गुरुजींची मदत बंद होणार.
३. शिक्षणही बंद होणार.
४. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार.
२.
१.
बरोबर
चूक
२.
१. नागरिकशास्त्राचा पेपर २. देशमुखांकडचं जेवण
३. शिक्षण हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहिले, तर त्याला शिक्षण म्हणता येत नाही. जे शिकलो ते वर्तनात आणणे, तसे आचरण करणे म्हणजे शिक्षण होय.
शिक्षणातून विविध मूल्ये, संस्कार मनावर रुजवले जातात. त्यांचा प्रत्यक्षात उपयोग झाला नाही, तर मात्र त्याची किंमत शून्य होते. 'प्राण्यांवर दया करा' हा उपदेश शिक्षणातून दिला जातो; पण प्रत्यक्षात आपण मात्र प्राण्यांशी क्रूरपणे वागत असू, तर त्या शिक्षणाला शिक्षण म्हणताच येणार नाही.
शिक्षण म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नव्हे, तर शिक्षण म्हणजे या पुस्तकातील मूल्यांचा, ज्ञानाचा प्रत्यक्ष जीवनात केलेला अवलंब होय.