Updated on: 2026-03-31 | Author: SSC Solutions Editorial Team

Marathi (Second Language) Chapter 17 Apthit Gady Solutions

Q1. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४) आकलन कृती १. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२) परिच्छेदामध्ये या महिन्याचा उल्लेख आला आहे. झाडाच्या या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे. चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. २. आकलन कृती १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२) पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______ हृदयाला आनंद बहाल करणारा ______

१.

परिच्छेदामध्ये चैत्र महिन्याचा उल्लेख आला आहे.

झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगांनी अवकाश भरून टाकलं आहे.

२.

पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं खूप देखणं आहे.

हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

Q2. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४) आकलन कृती १. एका वाक्यात उत्तरे लिहा. (०२) परिच्छेदामध्ये कोणत्या महिन्याचा उल्लेख आला आहे? झाड कोणत्या रंगांनी भरून टाकलं आहे? चैत्राचा महिना आहे. आसमंतातल्या साऱ्याच झाडांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल तिथं झाडाच्या फिक्या आणि गडद हिरव्या रंगानं अवकाश भरून टाकलं आहे. उन्ह तापत चाललं आहे; पण एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडं भक्क उजेड पिऊन आतून रसरशीत आणि हिरवीगार दिसत आहेत. ह्या झाडाचं प्रत्येक पान आणि हरेक डहाळी साैंर्द्यानंदानं बहरली आहे. ते उंच पिंपळाचे झाड बघत रहावं असं आहे. त्याची ती लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं किती देखणं आहे! खरंतर हा हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे. २. आकलन कृती १. सहसंबंध लक्षात घेऊन वाक्य पूर्ण करा. (०२) पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी ______ हृदयाला आनंद बहाल करणारा ______

१.

परिच्छेदामध्ये चैत्र महिन्याचा उल्लेख आला आहे.

झाड फिक्या आणि गडद हिरव्या रंगांनी भरून टाकलं आहे.

२.

पिंपळाच्या झाडाची लालसर हिरवी पालवी, वाऱ्याच्या उष्ण झुळुकीनं सळसळणं, तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून उभं असणं खूप देखणं आहे.

हृदयाला आनंद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

Q3. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४) आकलन कृती १. योग्य पर्याय निवडून विधान पूर्ण करा. i. बहुतेकजण परस्परांमधल्या नात्याबाबत गंभीर नसतात. (०१) अ) कारण ते आधी दुसऱ्याचा विचार करतात नंतर स्वत:चा विचार करतात. ब) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात. क) त्यांच्या दृष्टीने नातं ही एका अंतरावरली गोष्ट असते. ड) त्यांच्या दृष्टीने नातं अवकाश देणारे असावे. ii. आपल्या दृष्टीने नातं ही एक ______ (०१) अ) गुंतलेली गोष्ट असते. ब) विखुरलेली गोष्ट असते. क) अंतरावरील गोष्ट असते. ड) आपल्यासाठी सोईची गोष्ट असते. दुसऱ्या माणसाशी असलेलं आपलं नातं ही खरंतर किती महत्त्वाची गोष्ट आहे. बहुतेकजण परस्परांमधील नात्याबाबत गंभीर नसतात, कारण ते आधी स्वत:चा विचार करतात आणि नंतर दुसऱ्याचा विचार करतात. दुसरे आपल्यासाठी सोयीचे असतील, सुख देणारे असतील किंवा आपल्या विचारभावनांना अवकाश देणारे असतील, तरच आपण त्यांना विचारात घेतो. बऱ्याचदा आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते. आपण एखाद्याशी नात्यानं जोडलेले आहोत म्हणजे त्यांच्यात गुंतलेलो आहोत, पूर्णपणे सामावले आहोत असा अनुभव म्हणूनच आपल्याला येत नाही. खऱ्या नात्यामध्ये संवेदना विखुरलेली विभागलेली नसते, एकात्म असते. मात्र आपण नात्यात संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो. २. आकलन कृती १. वैशिष्ट्ये लिहा. (०२) खऱ्या नात्यामधील संवेदना ______ ______ ______ ______

१.

अ) कारण ते आधी स्वत:चा विचार करतात नंतर दुसऱ्याचा विचार करतात.

आपल्या दृष्टीने नातं ही एक अंतरावरील गोष्ट असते.

२.

१. खऱ्या नात्यामधील संवेदना

विखुरलेली नसते.

विभागलेली नसते.

एकात्म असते.

आपण नात्यात या संवेदनेचे वेगवेगळे स्तर अनुभवतो.

Q4. उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०४) आकलन कृती १. उत्तर लिहा. (०२) ग्रंथपालांना काय संबोधले आहे? फुले म्हणजे निसर्गाची कोणती अभिव्यक्ती आहे असे लेखक म्हणतो? पुस्तकांना आपण जवळ घेता घेता पुस्तकेही आपल्याला जवळ घेतात. वाचकांचा प्रवास हळूहळू लेखनापर्यंतही होऊ लागतो. शब्दांच्या छटांची तरलता जगण्याचे उत्सव फुलवू लागते. नव्या पिढीला माणूसपणाच्या तरलतम सुंदरतेकडे नेणं. हे तर पालक व शिक्षकांचं मूळ कार्य! या आनंदमय कामात ग्रंथ आपले प्रेरक ठरतात. म्हणूनच, ग्रंथपाल हे ग्रंथसंस्कृतीचे लोकपाल असतात. २. आकलन कृती १. पुढील आकृतिबंध पूर्ण करा. (०२)

Diagram: Refer textbook

Other Subjects